कार्यक्रमाबद्दल
रिझन ट्रॅफिक फॉउंडेशन तर्फे नुकताच
"अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींचा जागतिक स्मरण-दिन" कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून
श्री सुनील गवळी साहेब – वाहतूक पोलीस निरीक्षक, सिंहगड वाहतूक विभाग
तर प्रमुख वक्ते
श्री संजय ससाणे साहेब – पूर्व डेप्युटी आर.टी.ओ. आणि प्राचार्य, वाहन चलन प्रशिक्षण व संशोधन संस्था, पुणे
उपस्थित होते. तसेच
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सिंहगड विभाग – सह संघचालक श्री सचिनजी नागपुरे
आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सिंहगड रोड भागातील अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून
तसेच पुणे, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहून झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक झाल्यानंतर, सिंहगड रोड परिसरातील अपघातग्रस्त कुटुंबांचे मनोगत
प्रतिनिधिक स्वरूपात मांडण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना श्री गवळी साहेब यांनी रोड ट्रॅफिकबद्दल अनेक मुद्दे मांडले.
आपण नागरिकांना वाहतूक नियम पाळण्यास सांगतो, तेव्हा आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
उदाहरणार्थ, "नो पार्किंग" असेल तर योग्य पार्किंगची सोयही असली पाहिजे.
तसेच कोणतीही सुविधा उभारताना पुढील २५ ते ५० वर्षांचा विचार करून नियोजन केले पाहिजे.
वाहतुकीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, वाहतूक शिस्तीबरोबरच वाहतुकीतील बदलही स्वीकारले पाहिजेत,
कारण ते बदल ही सार्वजनिक सुविधेसाठीच केले जातात.
टू-व्हिलर रायडर्स, रिक्षाचालक, PMPML बस चालक तसेच सर्वसामान्य नागरिकांना
ट्रॅफिकचे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे.
नियम तोडणाऱ्यांपेक्षा नियम पाळणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे.
सुजाण नागरिकांच्या सहकार्याने हे शक्य आहे.
रिझन ट्रॅफिक फाउंडेशन व ट्रॅफिक पोलीस, नागरिकांच्या सहभागाने एकत्र काम करून
ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवू शकतात.
यामुळे सुरळीत व सुरक्षित रस्ता वाहतुकीची संस्कृती निर्माण होऊ शकते.